Special Report : मविआच्या बैठकीला वादाचं ग्रहण, निमंत्रणावरून प्रकाश आंबेडकर नाराज : ABP Majha
abp majha web team | 27 Jan 2024 07:59 AM (IST)

मविआत गेल्या काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडताना दिसतंय. अर्थात याला एकच कारण आहे ते म्हणजे जागावाटप... अद्याप जागावाटपाचा तिढा सुटला नाही तोवर मविआतील मित्र पक्षांमध्ये धूसफूस सुरु झालीये. त्याला कारण ठरलंय ते बैठकीचं निमंत्रण.. आज मुंबईत मविआची बैठक पार पडली.. ज्याचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनीही देण्यात आलं. मात्र तरीही ते बैठकीला गेले नाहीत.. तर राजू शेट्टींनीही आपल्याला निमंत्रण मिळालं नसल्याचं म्हटलंय.. पाहूया निमंत्रणावरुन कसं वादाला आमंत्रण मिळालंय