✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Congress MLA Meets CM Shinde : खोसकर आणि अंतापुरकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Special Report Congress MLA Meets CM Shinde : खोसकर आणि अंतापुरकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

abp majha web team Updated at: 15 Aug 2024 09:14 AM (IST)

Congress MLA Meets CM Eknath Shinde मुंबई: राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री (13 ऑगस्ट) या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. 


काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे.


एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर आमदार जितेश अंतापुरकर काय म्हणाले?


एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर आमदार जितेश अंतापुरकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मी ई-पिक पाहणी अहवाला संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमच्याकडे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मला मुख्यमंत्री यांनी वेळ दिली होती. त्यामुळे मी भेट घेतली. राजकीय चर्चा केली नाही, अशी माहिती जितेश अंतापुरकर यांनी दिली.


हिरामण खोसकर काय म्हणाले?


मी काँग्रेससोबत होतो आणि काँग्रेससोबतच राहणार आहे. मला उमेदवारी मिळणार आहे. मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असं हिरामण खोसकर यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना सांगितलं.


विधानपरिषेदत काँग्रेसची मतं फुटली-


विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत  महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण तिसऱ्या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला झाला. अजित पवार गटाची मते फोडण्याची शरद पवार गटाची रणतीनी यशस्वी झाली नाही.


काँग्रेस हायकमांडचा उलटा गेम


विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. या आमदारांना पक्षातून बाहेर काढले जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस व्होटिंग करुन गद्दारी करणाऱ्या या आमदारांबाबत एक वेगळीच चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असे आदेश  काँग्रेस हायकमांडने दिले आहेत.


हिरामण खोसकर काय म्हणाले होते?


मी 100 टक्के क्रॉस व्होटिंग केलेले नाही. मी मिलिंद नार्वेकरांना मतदान केले होते. माझी पक्षाला विनंती आहे की, मी चुकलेले नाही, मी 100 टक्के पार्टीला मतदान केले आहे. मी आजही काँग्रेससोबत आहेत, उद्याही पक्षासोबत आहे. काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. मी बाळासाहेब थोरात साहेबांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. साहेब तुम्ही आम्हा 7 लोकांना मिलिंद नार्वेकर यांना मतदान करायला सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही रुममध्ये जाऊन मतदान केले. 

TRENDING VIDEOS

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, 'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ7 Day ago

Maharashtra News | Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक7 Day ago

Azam Khan Bail | अखेरच्या गुन्ह्यातही जामीन, आज Azam Khan तुरुंगातून बाहेर येणार?7 Day ago

Maharashtra Floods | Parbhani च्या Takli Neelwarn गावाचा संपर्क तुटला, पूल पाण्याखाली, शेतीचं नुकसान7 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.