Special Report Cattle Research Centre : गोवंश संशोधन केंद्र परळीला हलवले : ABP Majha
abp majha web team | 23 Sep 2023 04:09 PM (IST)
मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला हलवून लातूर आणि नांदेडकरांना हिसका दिला. या विषयावर लातूर आणि नांदेडचे लोक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी याशिवाय कृषी विभागाच्या अनेक योजना बीड जिल्ह्यातल्या थेट परळीला आणि अंबाजोगाईला नेल्या. खरं म्हणजे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये विकासाची गरज असताना याच विभागातल्या जिल्ह्यांनी एकमेकांवरती कुरघोडी करणं हे कितपत योग्य असा प्रश्न विचारला जातोय..