Special Report : पीक विमा कंपनीची १६ कार्यालये बंद होणार, विमा कंपनीची मनमानी सरकार थांबवणार?
abp majha web team | 30 Nov 2022 11:09 PM (IST)

आधी आस्मानी आणि आता सुलतानी संकटात बळीराजा अडकलाय. पीकविमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी पुरते हैराण झालेत. अकोल्यात पीकविमा कंपनीने तर शेतकऱ्यांची थट्टाच केलीये. शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईपोटी 90 रूपये, 155 रूपये देवू केलेत. . तर दुसरीकडे पीक विमा योजनेचं काम बघणाऱ्या AIC कंपनीने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना संकटात टाकलंय. काय आहे हा निर्णय पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट