Special Report : नगरच्या उड्डाणपुलावरुन श्रेयवादाची लढाई ! : ABP Majha
abp majha web team | 06 Nov 2022 08:51 PM (IST)

बातमी वादात अडकलेल्या नगरच्या उड्डाणपुलाची. नगरकर ज्या उड्डाण पुलाची गेल्या १२ ते १४ वर्षांपासून वाट पाहत होते. त्या उड्डाणपुलावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झालीये. ज्या उड्डाण पुलाचं १९ नोव्हेंबरला केंद्रिय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. त्या उड्डाण पुलावर ठाकरे गटाच्या शिवसेनेने आधीच शुभारंभाचा नारळ फोडला. त्यामुळे नवा वाद पेटलाय. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट.