Special Report : बा शेतकऱ्या विश्वास ठेव! अंधारातल्या शेतकऱ्याला हवा मदतीचा हात
abp majha web team | 21 Oct 2022 09:26 PM (IST)

Special Report : आपण सगळे दिवाळीच्या मूडमध्ये आहोत. ही दिवाळी आपल्यासाठी जरी आनंद घेवून आली असली तरी शेतकऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार नाहीये त्याचं कारण आहे परतीचा पाऊस. पिकातून चार पैसे येतील, त्यातूून आपण दिवाळी साजरी करु हे शेतकऱ्यांचं स्वप्न एका पावसाने उद्धवस्त केलंय. आणि म्हणूनच या दिवाळीला दुखा:च्या अंधारात असलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारा दिवा लावण्याची गरज आहे.