Solapur Stadium Special Report : सोलापूर रणजी सामन्यांसाठी सज्ज! क्रिकेट स्टेडिअमचं नूतनीकरण
abp majha web team | 22 Sep 2022 11:31 PM (IST)

Solapur Stadium Special Report : सोलापुरातील क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे. सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील धावपट्टी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उत्तम आहे. अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सोलापुरात रणजी क्रिकेट सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नूतनीकरणानंतर या स्टेडियमचे रुपडे कसे पालटले आहे पाहूयात आफताब शेख या खास रिपोर्टमधून...