Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report
सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांचा वेगळा अध्याय सुरु झालाय. भाजप नेते राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप करत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खळबळ उडवून दिलीय. स्वतः राम सातपुतेंनीही हा दावा उचलून धरत विरोधकांवर नावानिशी आरोप केलेत. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात सध्या दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलाय. याचाच आढावा घेऊया, राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मंगळवारी हा दावा केला आणि सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर जिल्ह्यातलं वातावरण तापायला सुरुवात झालीय.
माळशिरसमधील भाजप नेते राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर माध्यमांचे कॅमेरे अर्थातच सातपुतेंच्या दिशेनं वळाले.
गोरेंनी केलेल्या आरोपांची पुष्टी तर त्यांनी केलीच..
शिवाय आपल्या हत्येच्या कटामागे कुणाचा हात आहे?, हे नावानिशी सांगत मोहिते बंधूंकडे बोट दाखवलंय
पालकमंत्र्यांनी केलेले आरोप आणि सातपुतेंनी थेट नाव घेऊन टीका केल्यानंतर धैर्यशील मोहितेंनी पलटवार केलाय.
केवळ मोहिते पाटलांवर आरोप करून सातपुते थांबले नाहीत.
तर त्यासोबत उत्तमराव जानकरांच्या मुलाचा पराभव झाल्याचा संदर्भ देत आपल्या हत्येच्या कटाशी त्यांचाही संबंध असल्याचे संकेत दिले.
त्यावर जानकरांनी अत्यंत शेलक्या शब्दात सातपुतेंचा समाचार घेतलाय.
All Shows


































