Solapur Lockdown : सणासुदीसाठी सामान भरायचं की नाही? तिसऱ्या लाटेच्या भीतीने व्यापाऱ्यांत संभ्रम
आफताब शेख, एबीपी माझा | 27 Aug 2021 09:19 PM (IST)
Solapur : राज्यात लॉकडाऊनच्या धोरण अस्वस्थतेमुळे व्यापारी पुन्हा एकदा धास्तावले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर नीती आयोगाने दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली आहे. आणि अशात निर्बंधामध्ये शिथिलता देत असताना जर बाजारात गर्दी होऊ लागली आणि रुग्ण संख्या वाढली तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीसाठी माल भरायचा कि नाही असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.