✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Sofiya qureshi & Vyomika Singh:ऑपरेशन सिंदूरसाठी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांची निवड का केली?

abp majha web team   |  07 May 2025 10:43 PM (IST)

पहलगाममध्ये जिहादी अतिरेक्यांनी  निष्पाप पर्यटकांना धर्म विचारुन मारलं.. ज्यांचं कुंकू पुसलं गेलं त्या माताभगिनींचा आक्रोश सगळ्या जगाने ऐकला.. त्या आक्रोशाचं उत्तर भारताने ऑपरेशन सिंदूरने दिलंय.
१५ दिवसांत पाकिस्तानमधले अतिरेकी अड्डे भारतीय सेनेनं हवाई हल्ला करुन उद्धवस्त केलेत.  या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी भारतीय सेनेनं दोन जिगरबाज, तडफदार महिला अधिकाऱ्यांवर टाकली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग त्यांचं नाव.. या सगळ्या कृती मागे कोणता विचार होता पाहुयात.


 


पाकिस्तानी दहशतवादाला भारताने आज मोठा दणका दिला. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने आज पत्रकार परिषद घेत आज या संपूर्ण हल्ल्याची माहिती पुराव्यांसह दिली. पाकव्याप्त काश्मिरातील 5 आणि पाकिस्तानातले 4 दहशतवादी तळ भारताने बेचिराख केले. भारतीय लष्कराने 1 वाजून 5 मिनिटांनी हल्ल्याला सुरूवात केली. तर 1 वाजून 30 मिनिटांनी भारतीय लष्कराने ही मोहीम फत्ते केली. बरोबर 25 मिनिटांत ही कारवाई भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली. आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी (Col. Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Wing Commander Vyomika Singh) यांनी आज पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली. या हल्ल्यात एकाही पाकिस्तानी रहिवासी विभागाला किंवा पाकिस्तानी लष्काराच्या तळाला धक्का पोहोचवण्यात आला नाही.


पाकिस्तानात 100 किमी आत घुसून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला, अशी माहिती भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरनंतर दिली. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सैन्याने दिलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. भारतीय लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा पुराव्यांसह बुरखा फाडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत?, अशी सध्या चर्चा सुरु आहे. 


कोण आहे सोफिया कुरेशी? ( Who IS Colonel Sofia Qureshi )


सोफिया कुरेशी या मूळची गुजरातची आहे. सोफिया कुरेशी यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. एका माहितीनूसार सोफियाचे आजोबा देखील सैन्यात होते आणि तिच्या वडिलांनी काही वर्षे सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणूनही काम केले होते. सोफिया यांनी 1999 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाली. सोफिया यांनी 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले. 2006 मध्ये, सोफियाने काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. 2010 पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेत. पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान तिच्या सेवेबद्दल तिला जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले आहे. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान तिच्या उत्कृष्ट कामाबद्दल तिला सिग्नल ऑफिसर इन चीफ (एसओ-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले. कर्नल सोफिया कुरेशी यांनी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व केले तेव्हा त्या देखील चर्चेत आल्या. भारतीय तुकडीचे नेतृत्व करणारी भारतीय लष्करातील सोफिया ही पहिली महिला अधिकारी बनली. या सरावाचे नाव 'एक्सरसाइज फोर्स 18' असे होते. या सरावात कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या.


कोण आहे विंग कमांडर व्योमिका सिंग? (Who is Wing Commander Vyomika Singh?)


18 डिसेंबर 2004 रोजी भारतीय हवाई दलात नियुक्त झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांना सध्याच्या काळातील सर्वोत्तम विंग कमांडरपैकी एक मानल्या जातात. व्योमिका सिंग यांना लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा उत्तम अनुभव आहे. व्योमिका सिंग यांना अडीच हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव मिळाला आहे. व्योमिकाने ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या कठीण भागात चिता आणि चेतक सारखी हेलिकॉप्टर उडवली आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये, त्यांनी अरुणाचल प्रदेशात एक अतिशय कठीण मोहीम राबवली आणि जीव वाचवले. भारतीय हवाई दलाचा वैमानिक म्हणून धोकादायक भागात उड्डाण करण्याचा व्योमिका सिंग यांना चांगला अनुभव आहे


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Sofiya qureshi & Vyomika Singh:ऑपरेशन सिंदूरसाठी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांची निवड का केली?

TRENDING VIDEOS

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात28 Minutes ago

T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं2 Hour ago

Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले3 Hour ago

Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना5 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.