Sindhudurg Chipi Airport च्या उद्घाटनााधी कोकणात राजकीय शिमगा; उद्या राणे-ठाकरे एकाच मंचावर
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2021 10:13 PM (IST)

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन होतंय.. या निमित्तानं एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बऱ्याच वर्षांनी एकाच मंचावर येतायेत. मात्र हा कार्यक्रम वादाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. कारण या कार्यक्रमाआधी कोकणात राजकीय शिमगा सुरु झालाय..