Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
abp majha web team | 19 May 2026 12:08 AM (IST)

हौसेला मोल नसतं... पण लाखमोलाच्या चांदीची चर्चा होत असताना कोल्हापुरातल्या एका सासऱ्यानं आपल्या जावयासाठी चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतलीय.
अधिक मास सुरू असल्यामुळे त्यानं ही चप्पल आपल्या जावयाला गिफ्ट केलीय...
बघुयात...
कोल्हापूरकरांचा नादच खुळा...
ही आहे चक्क दीड किलोंची चांदीची कोल्हापुरी चप्पल...
अधिक मास सुरू झालाय...
आणि याच निमित्तानं आपल्या परदेशातल्या जावयाला गिफ्ट म्हणून
कोल्हापुरातल्या एका सासऱ्यानं आपल्या जावयासाठी
ही अनोखी चांदीची चप्पल बनवून घेतलीय...
अर्थात चांदीच्या सध्याच्या दरांचा विचार केला
तर या चपलेची किंमत किती हा प्रश्न
आपल्या मनात आला असेलच?
तर या चपलेची किंमत आहे साडे चार लाख रुपये...
होय तब्बल साडेचार लाख रूपये....
कोल्हापुरातल्याच विक्रांत माळी यांनी ती तयार केलीय...