Siddheshwar Sakhar Karkhana : विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या 'चिमणी'वर हातोडा पडणार Special Report
abp majha web team
Updated at:
14 Jun 2023 09:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखेर तो दिवस आलाच... सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करण्यात येणार... खरंतर, या चिमणीतून अनेक वर्षांपासून राजकारणाचा धूर बाहेर पडतोय... चिमणी वाचवण्यासाठी याच चिमणीभोवती आंदोलनं पिंगा घालतायत... मात्र, आता ही चिमणी पाडण्यात येणारेय... त्याला कारण आहे विमानतळ... विमानाच्या उड्डाणाला अडथळा ठरत असल्याचं कारण देऊन, ही चिमणी पाडली जाणारेय... त्यावरूनही आरोपांचा फुपाटा उडेलच... मात्र, या फुपाट्यातून विमानाचं उड्डाण नक्की होणार की विमानसेवेची घोषणा हवेतच तरंगत राहणार... याकडे सोलापूरकरांचे डोळे लागलेयत...