Special Report Egg Rate :राज्यात अंड्याचा तुटवडा! वाढली थंडी, महागली अंडी, 80 ते 90 रुपये डझन अंडी
abp majha web team | 19 Jan 2023 11:44 AM (IST)
Egg Price Hike Special Report :राज्यात अंड्याचा तुटवडा! वाढली थंडी, महागली अंडी, ८० ते ९० रुपये डझन अंडी
थंडीला सुरुवात झाली की बऱ्याच जणांच्या ताटात अंड्याचा समावेश होतो. पण यंदा भर थंडीत अंड्याचे दर सर्वसामान्यांचा खिसा गरम करतायत. ऐरवी ४ ते ५ रुपयांना मिळणाऱ्या अंड्याचे दर आता चक्क ८ ते ९ रुपयांवर गेलेयत. म्हणजेच जवळपास दुपटीने अंड्याचे भाव वाढलेयत. त्यामुळे आत्ता अंडी भाव का खातायत. आणि अंड्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातायत जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.