KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
कल्याण-डोंबिवली.... बघायला गेलं तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे या महापालिकांच्या तुलनेत तशी कमी महत्त्वाची महापालिका... पण सध्या ही महापालिका चर्चेच्या केंद्रस्थानी आलीय ती तिथल्या राजकीय फोडाफोडीमुळे... कारण भाजप आणि शिवसेनेला जवळपास समसमान जागा मिळाल्यात.. आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी घोडेबाजार देखील सुरू झालाय.. अर्थात याला रवींद्र चव्हाण आणि शिंदे पिता-पुत्र यांच्यातल्या राजकीय संघर्षाचीही किनार आहे... आता या संघर्षात नेमकं कुणाचं कल्याण होतं आणि कुणाचं वाटोळं? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे..
हापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी याच कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांचे कार्यकर्ते पळवले.... आणि प्रकरण दिल्लीपर्यंत गेलं...
आणि आता निकालानंतर कल्याण-डोंबिवली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय ते महापौरपदाच्या तिढ्यामुळे...
कारण कल्याण-डोंबिवलीच्या मतदारांनी कौलच तसा दिलाय..
कल्याण डोंबिवली महापालिकेतला बहुमताचा आकडा आहे ६२.... शिवसेना ५४ जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे... तर भाजपनं देखील हाफ सेंच्युरी मारली आहे.. मात्र भाजपचा स्ट्राईक रेट आहे ९२ टक्के तर शिवसेनेचा ७९ टक्के
ज्या महायुतीला कल्याण-डोंबिवलीकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय. त्याच महायुतीमध्ये, म्हणजे भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू झालीय...
तूर्तास महायुतीचा महापौर होणार असा सूर दोन्ही पक्षाचे नेते आळवताहेत..
मात्र संपूर्ण पाच वर्षे शिवसेनेचा महापौर असणार की भाजपसोबत महापौरपद ठराविक वर्षांसाठी वाटून घेतलं जाणार? या प्रश्नाचं ठोस उत्तर अजून तरी कोणी देत नाहीय..