Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं पालघरच्या जनतेला,
गेल्या काही दिवसांपासून राजकीय रामलीला पाहायला मिळतेय...
मात्र यात राम कोण आणि रावण कोण? हे काही इथल्या गोरगरीब जनतेला अजून कळेनासं झालं...
रविवारी पालघरमध्ये एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली
यावेळी त्यांनी २ तारखेला ईव्हीएमचं बटण दाबताना अहंकाराचा रावण जाळून टाकण्याचं आवाहन केलं..
थेट नाव न घेता, पण रावणाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी टीकेचे बाण नेमके कुणाकडे सोडले होते ?
या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी पालघरच्या भोळ्याभाबड्या जनतेला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बुधवारी झालेल्या सभेची वाट पाहावी लागली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
यांच्यातली रामलीला रावणदहनापुरती मर्यादीत नाहीय...
तर एकाधिकारशाहीचा अंत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी बाण सोडले जाताहेत..
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं हे द्वंद्व सुरू असतानाच... रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांनी देखील एक शिंदेंच्या दिशेनं टीका आणि टोल्याचा एक एक बाण सोडला