Shiv Sena - NCP तील बंड एकसारखं? प्रफुल्ल पटेलांना आव्हाडांचं चोख उत्तर Special Report
abp majha web team | 26 Sep 2023 11:35 PM (IST)

बुलेटिनच्या सुरूवातीलाच बातमी, राष्ट्रवादीतील आरोप प्रत्यारोपांची... महाराष्ट्रात दोन पक्षांमध्ये दोन मोठी बंड झालीयत... आणि ही दोन्ही बंड अशीतशी नाहीत, तर थेट चिन्ह आणि पक्षावरच दावे सांगितले गेलेत. वरवर पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीतलं बंड एकसारखंच दिसतंय. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या बंडांमध्ये फरक असल्याचं वक्तव्य केलंय. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस टीका केलीय. दोन्ही बंडांचे लेखक, दिग्दर्शक एकच असल्याचं वक्तव्य जितंद्र आव्हाड यांनी केलंय.