Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

राजकारणातले भीष्म पितामह म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते शरद पवार जेव्हा एखादी भूमिका मांडतात तेव्हा त्याची ब्रेकिंग न्यूज होते... आजही शरद पवारांनी अशीच एक ब्रेकिंग न्यूज दिलीय.. कारण त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे... काय आहे ती भूमिका? दुसऱ्या राष्ट्रवादीला ती कितपत पटले? आणि शरद पवारांच्या या भूमिकेचे काय पडसाद उमटू शकतात? पाहुयात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा हा स्पेशल रिपोर्ट
राजकारणात थोडा तरी इंट्रेस्ट असेल, तर
पुढची काही मिनिटं कान आणि डोळे इथे असू द्या..
कारण शरद पवारांनी मोठं स्टेटमेंट केलंय..
ऐकलंत ना...? पक्षप्रमुख म्हणून पवार काय म्हणाले ते...
यायचं असेल तर आमच्यात या...
आणि आम्ही कुणासोबतही जाणार नाही...
तसंच जवळ येणं वेगळं आणि पक्षात सामील होणं वेगळं यातला फरक अधोरेखित करायलाही शरद पवार विसरले नाहीत
दुष्काळ आणि इतर विषयासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली
या बैठकीतल्या मंचावरून बोलताना,
शरद पवारांनी नाव घेणं जरी टाळलं असलं तरी...
त्यांचा निरोप विभक्त झालेल्या राष्ट्रवादीला...
आणि अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व करणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी होता, हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाही
दुष्काळ, बेरोजगारी, पेपर फुटी आणि SIR
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बोलवलेल्या राज्यस्तरीय बैठकीतले हे प्रमुख मुद्दे
पण ब्रेकिंग न्यूज झाली ती शरद पवारांनी विलिनीकरणाबाबत मांडलेल्या भूमिकेची
आता शरद पवारांनी नेमकं कोणतं टायमिंग साधलंय?
या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांसोबत कित्येक दशकं राहिलेले....
आणि सध्या दुसऱ्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे, सुनील तटकरेंनाही सापडत नाहीय
शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर सुनेत्रा पवार काय स्टँड घेतात याची फक्त,
पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनांच नव्हे, संपूर्ण राजकीय वर्तुळाला प्रतीक्षा आहे...
सुनेत्रा पवारांची आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भूमिका एकच असेल की वेगळी असू शकते?
तुम्हाला काय वाटतं?
सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही...
पण सुनील तटकरे काय म्हणताहेत? ऐकुयात...
दोन्ही राष्ट्रवादींच्या प्रश्नांत शिवसेनेला फारसा इंट्रेस्ट दिसत नाही... आणि जरी असला तरी तो उघडपणे दाखवणं कदाचित योग्य वाटत नाहीय...
मध्यंतरी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती
आजच्या पवारांच्या वक्तव्याच्या संदर्भानं, चंद्रशेखर बावनकुळेंना विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलंय.. तुम्हीच ऐका
तब्बल सहा दशकं राजकारणात असणाऱ्या शरद पवारांना,
गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाचे खाचखळगे चांगलेच माहिती आहेत...
ज्या विलिनीकरणाच्या चर्चेला ब्रेक मिळाला होता,
ते विलिनीकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचं काम शरद पवारांच्या वक्तव्यानं केलंय
आता राजकीय पंडित शरद पवारांच्या वक्तव्याचा आणि भूमिकेचं वेगवेगळ्या परिनं विश्लेषण करून अर्थ काढत बसले असतील
मात्र शरद पवारांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? हे समजण्यासाठी पुढच्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात काय घडामोडी होताहेत यावर बारीक नजर ठेवावी लागेल