✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Sharad Pawar On Ajit Pawar : माळेगावच्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार? Special Report

abp majha web team  |  18 Jun 2025 10:55 PM (IST)
ABP News

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पवार काका पुतण्यांची जोरदार चर्चा आहे. पण आता पवार काका पुतणे पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकलेत. निमित्त आहे बारामती तालुक्यातील राजकारणाचं महत्वाचं केंद्र असलेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. ही निवडणूक येत्या २२ जूनला होतेय. शरद पवार स्वत: प्रचारात उतरलेयत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारही मैदानात आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेनंतर माळेगाव कारखाना निवडणुकीत तिसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. पाहूयात याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...



एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीला असून असून किती महत्व असणार.. तुम्हाला असं वाटत असेल तर  थोडं थांबा.. हा साधासुधा कारखाना नाहीय तर हा आहे बारामती तालुक्यातील राजकारणाचं महत्वाचं केंद्र असलेला 
माळेगाव सहकारी साखर कारखाना..
२२ तारखेला होणाऱ्या  निवडणुकीत पवार काका-पुतणे आमनेसामने उभा ठाकले आहेत.
हा स्थानिक प्रश्न असल्याचं सांगत असले तरी शरद पवार स्वत: प्रचारात उतरले आहेत.
BITE- शरद पवार
((या निवडणुकीकडे राज्याकडं राज्याचे लक्ष लागलं आहे असं कसे म्हणता येईल
हा स्थानिक प्रश्न आहे
आजू बाजूला जे तालुके आहेत त्यांचे लक्ष इथे नाही))
VO
एकिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार ब गटातून स्वत: अध्यक्षपदासाठी उभा आहेत तर दुसरीकडे युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सगळी सूत्रं स्वत: शरद पवारांनी हाती घेतली आहेत. 
BITE- शरद पवार
((या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती आजही नाही
एक विशिष्ट स्थिती झाली
लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं
पण हे आम्ही दीर्घकालीन समजत नाही हा या कारखान्या पुरतं मर्यादित होतं
))
VO
लोकसभा, विधानसभेनंतर माळेगाव कारखाना निवडणूकीत तिसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.  ही निवडणूक जितकी शरद पवार विरुद्ध अजित पवार आहे. तितकीच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारसुद्धा आहे. शरद पवारांच्या आक्षेपांना अजित पवारांनी  उत्तरं दिली...
तावरेंच्या वयावरुन आणि प्रकृतीवरुन अजितदादांनी खास आपल्या शैलीत टीका सुद्धा केली.
BITE- अजित पवार
((मी फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचार घेऊन पुढे चाललो आहे. वय झाल्यावर कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही पायजम्यावरून लुंगी वर आला त्रास होतोय म्हणूनच आला ना?
कुठे डाग पडेल असं आजपर्यंत कधी मी काम केलं नाही.))
VO
खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आपली पॉलिटिकली करेक्ट भूमिका कायम ठेवली. बारीक सारीक गोष्टींवरुन राजकारण सुरु असतानाच  सुप्रियाताईंनी नात्याचं महत्व महाराष्ट्राला पुन्हा एकदा समजावून सांगितलं. तर अजित पवारांचे शिलेदार हसन मुश्रीफ सगळा भार पंढरीच्या विठ्ठलावर टाकून मोकळे झाले
२ विंडो BITE- सुप्रिया+मुश्रीफ
Z:1806BARAMATIBARAMATI SUPRIYA SULE BYTE
((कौटुंबिक संबंध आमच्याकडून नेहमीच राहतील. 
नाती जपणं ही आपली संस्कृती आहे. 
माझ्याकडून कुठल्याच नात्यात कधीच अंतर येणार नाही 
फक्त पवार नाही आदरणीय पवार साहेब आणि माझ्या आईने राज्यात देशात जीजी नाती आजपर्यंत जपले आहेत ती जपण्याचा प्रांजळ प्रयत्न आपल्या संस्कारातच आहे. मला त्यात वेगळे नाविन्य वाटत नाही. ))
+
BITE- हसन मुश्रीफ
((R DEHU COLOURFUL VIS LIVE 180625
 पांडुरंगाच्या मनात असेल तर तेव्हा अजित पवार पुजा करतील. 
माळेगाव आणि शरद पवारांच्या वक्त्यव्यावर बोलले आहेत))


VO
माळेगाव कारखान्यावर पवारांची एकहाती सत्ता राहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याचे १९ हजार ६०० सभासद आहेत. अजितदादांना काका शरद पवार, चुलत बहीण सुप्रिया सुळे, पुतण्या युगेंद्र पवार यांच्यासोबतच पारंपरिक विरोधक चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्याशीही सामना करावा लागणार आहे. २२ तारखेला होणाऱ्या मतदानात कोण बाजी मारणार हे २४ तारखेला कळणार आहे. नाही नाही म्हणत शरद पवारांनी पॅनल उभा केल्याने माळेगाव कारखाना निवडणुकीत रंगत भरली आहे.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Sharad Pawar On Ajit Pawar : माळेगावच्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.