जात पंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे सात बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा : स्पेशल रिपोर्ट
सारंग पांडे, एबीपी माझा | 07 Jun 2021 11:02 PM (IST)

चंद्रपूर : जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना असून यामुळे जातपंचायतीचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रकाश ओगले असं 58 वर्षीय मृतकाचं नाव असून काल त्यांचा मृत्यू झाला. मात्र गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. आणि जो त्यांच्या पार्थिवाला खांदा देईल त्याला जात बहिष्कृत करण्यात येईल अशी धमकी दिल्यामुळे प्रकाश ओगले यांच्या 7 मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला.