School Uniform Special Report : शिक्षण नावाच्या बाजाराचं वास्तव, अनेक शाळांकडून पालकांची लूट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSchool Uniform Special Report : शिक्षण नावाच्या बाजाराचं वास्तव, अनेक शाळांकडून पालकांची लूट
आपल्या कष्टाचा पैसा कुणाला तरी कमिशन म्हणून जातो तेव्हा पालकांची काय अवस्था होत असेल? आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी पालक जीवाचं रान करतात. ओव्हरटाईम करून, काटकसर करून ते पै पै वाचवतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. पण शिक्षणाच्या नावाखाली याच पालकांची कशी लूट होते, ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शाळेचा गणवेश विशिष्ट दुकानातूनच घ्यायचे, अशी सक्ती अनेक शाळांकडून केली जाते. पण यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? एकच कारण आहे, आणि ते म्हणजे कमिशन. गणवेश विक्रेते या शाळाचालकांना १० टक्के कमिशन देतात. वर्षाला हजारो गणवेशांची विक्री होते. त्यामुळे कमिशनचा हा खेळ कोट्यवधींमध्ये जातो. या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी माझानं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं. आणि यातून हे सगळं धक्कादायक वास्तव समोर आलं.