Satara Special Report : दरडीखालील शेतजमिनीचा 'श्वास' मोकळा, संकटाची दरड हटली! ABP Majha
राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा
Updated at:
13 Feb 2022 11:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSatara : महाबळेश्वरमधल्या दरडग्रस्त वाड्या वस्त्यांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली. नाम फाऊंडेशन आणि सातारा प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ८० गावातील शेतजमीनी पूर्ववत केल्या जाणार आहेत. त्यामुळे गोरोशी, चतुरबेट, पार दुधगाव, जावली इथल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. शेतीचा प्रश्न जरी मार्गी लागला असले तरी येथील शेतकऱ्यांच्या समस्या अजून संपलेल्या नाहीत. पिण्यासाठी पाणी, रस्ता अशा मुलभूत सोयींच्या समस्या अजूनही तशाच आहेत.