Satara Dangal Special Report : साताऱ्यातील पुसेसावळीत दोन गटांत राडा, पोस्टमुळे धुमसली दंगल?
abp majha web team | 11 Sep 2023 10:29 PM (IST)
पाचवीला पुजलेला दुष्काळ... तरीही घाम गाळत शेती करणारे शेतकरी... पिकेल त्यावर गुजरान करणारे ग्रामस्थ आणि आजूबाजूला धार्मिक स्थळांचं अध्यात्मिक वातावरण... सातारा जिल्ह्यातील हीच पुसेसावळी सध्या धुमसतेय... इथं झालेल्या दंगलीत दोघांचा जीवही गेलाय... आणि हे सगळं होण्यामागे काडी टाकलीय, सोशल मीडियावरील एका पोस्टने... पाहूयात... एक पोस्ट आणि संपूर्ण सातारा जिल्हाच कसा वेठीला धरला गेलाय.