Pune : कोरोना काळात पुणेकरांचा आधार ठरलेल्या 'ससून'ची संघर्षगाथा, ससूनला आणखी सक्षम करण्याची गरज
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
16 Apr 2021 08:01 PM (IST)
पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयात पुण्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या शहरांमधील कोरोना रुग्णांनाही उपचारांसाठी आणलं जातंय. त्यांपैकी अनेक रुग्ण ससूनला पोहोचण्याआधीच मृत्त्यूमुखी पडतायत . त्यामुळं ससूनच्या नावावर मृत्यूदेखील जास्त नोंद होतायत. दुसरीकडे सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे इथल्या यंत्रणेवर ताण दिवसेंदिवस वाढत चाललाय. मात्र या कशामुळेही निराश न होता इथले डॉक्टर्स रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतायत, आता गरज आहे या रुग्णालय प्रशासनाला आणखी सक्षम करण्याचीमं.