Sambhajinaar Robbery : चोरीचा छडा! जादूटोण्याचा उलगडा! लड्डा चोरी प्रकरणात मोठा ट्वीस्ट Special Report
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोड्यात एक खळबळजनक बाब समोर आली आहे. संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या घरातील रोकडवर डोळा ठेवून जादूटोण्याच्या सहाय्याने ती पळवण्याचा अजब कट आखण्यात आला होता. लड्डा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड जमा असल्याची टीप त्यांचा जवळचाच मित्र बाळासाहेब इंगोले याने आपल्या काही साथीदारांना दिली होती. ही रक्कम चोरून नेण्यासाठी त्यांनी थेट जादूटोण्याचा आधार घेण्याचा निर्णय घेतला होता. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी 15 मे रोजी मोठा दरोडा पडला होता. या दरोडाच्या घटनेत संशयित असलेला आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांनी एन्काऊंटर केलाय. या दरोड्यात साडेपाच किलो सोनं, 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दरोडाच्या घटनेतील संशयित आरोपी अमोल खोतकर यांने गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे.
जादूटोण्याच्या सहाय्याने आखला चोरीचा डाव, पण...
संतोष लड्डा यांच्या घरी करोडो रुपये पोत्यात भरून ठेवेलेले आहेत, अशी टीप त्यांचाच जवळचा मित्र बाळासाहेब इंगोले याने दिली होती. पण, बाळासाहेब इंगोले आणि त्याच्या काही साथीदारांना ही रक्कम जादूटोणा करून पळवायची होती. म्हणजे एक महाराज जादूटोणा करतो आणि घरात असलेले पैसे हात न लावता बाहेर काढतो, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी तो महाराजही शोधून ठेवला होता. पण, याबाबतची माहिती हासबे नावाच्या आरोपीला मिळाली होती. हासबे याने त्याच्या टीमसह संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकत मुद्देमाल पळवून नेल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.