Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
गोपनियता हा मतदाराचा मूलभूत अधिकार आहे हे आपण सर्वांनी नागरिकशास्त्रामध्ये शिकलंय.. मात्र हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगरांना पुन्हा एकदा नागरिकशास्त्राचं पुस्तक हातात द्यायला पाहिजे.. कारण त्यांनी कारनामाच तसा केलाय.. आमदार महाशयांनी मतदान करणाऱ्या एका महिलेला चक्क ईव्हीएमची कोणती बटणं दाबायची हे सांगितलं... तसंच स्वतः मतदान केल्यानंतर ईव्हीएमसमोर मोबाईल देखील वापरला... एबीपी माझाच्या बातमीनंतर संतोष बांगरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मात्र त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते याकडे महाराष्ट्राचं नक्कीच लक्ष असेल
मतदान केंद्रातल्या या महाशयांची तशी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीय..
पण ज्यांचं राजकारण थोडं कच्च आहे, त्यांना किमान तोंड ओळख तरी करून देऊयात
((संतोष बांगर चेहरा वळवून समोर बघतो तिथे फ्रीज करा... आणि मग नावाचं अल्फा टेक्स्ट वापरा - संतोष बांगर, आमदार - कळमनुरी (शिवसेना)))
संतोष बांगर, हिंगोलीतल्या कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार...
तर आमदार महोदय मतदान केंद्रावर पक्षकार्यालयात वावर असल्यासारखे बिनधास्त फिरत होते.
बोटाला शाई लावण्याआधीच त्यांना ईव्हीएमचं बटण दाबायची घाई झाली होती
((शाई लावणारा बांगर यांना बोलवून घेतो ते अँबियन्ससह सोडा))
आता संतोष बांगर यांचा पठ्ठ्या आणि त्याच्या हातातल्या मोबाईलवर एक नजर टाका
((संतोष बांगर यांचा कार्यकर्ता हातात मोबाईल घेऊन काही तरी सुरू करतो हे एस्टाब्लिश झालं पाहिजे))
त्यानं मोबाईलमध्ये नेमकं काय सुरू केलं हे त्या पठ्ठ्याला आणि आमदार महोदयांना माहीत
खिशात मोबाईल घेऊन संतोष बांगर ईव्हीएम मशीनच्या दिशेनं निघाले...
आधीच तिथे एक महिला मतदान करत होती..
संतोष बांगर यांनी चक्क त्या महिलेला कोणती बटणं दाबायची हे चढ्या आवाजात सांगायला सुरूवात केली
((अजून झालं नाही... तिन्ही दाबायचे .. ते तिकडे.. ते पलिकडे हा डायलॉग दोनदा लूप करा... दुसऱ्या लूपला थोडी वेगळी व्हिज्युल ट्रीटमेंट द्यावी))
((रिपोर्टर पीटूसी - गोपनियता हा कोणत्याही मतदाराचा महत्त्वाचा अधिकार.. मात्र आमदार संतोष बांगर यांनी याच अधिकाराची भर मतदान केंद्रात निवडणूक कर्मचाऱ्यांसमोर हत्या केली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.. आणि हा गुन्हा करताना संतोष बांगर कॅमेऱ्यात कैद झाले. ))
व्हीओ-२
आता संतोष बांगर स्वतः मतदान करण्यासाठी ईव्हीएम समोर उभे राहिले...
मतदान झाल्यावर त्यांनी आणखी एक नियम पायदळी तुडवला...
हातातल्या मोबाईलनं त्यांनी ईव्हीएमचं व्हिडीओ शूटिंग केल्याचं दिसतंय
कदाचित यासाठीच पठ्ठ्यानं संतोष बांगर यांना मोबाईलचा कॅमेरा सुरू करून दिला होता का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय
((आधी पट्ट्या फोन चालू करताना ट्रीट केलेला व्हीडिओ आणि बांगर शूटिंग))
((टीव्ही स्क्रीनमध्ये संतोष बांगरची ऑन एअर गेलेल्या बातमीची क्लिप प्ले करा))
लोकशाहीची थट्टा मांडणाऱ्या आमदार संतोष बांगर यांचा प्रताप, महाराष्ट्रानं एबीपी माझावर बातमीच्या स्वरूपात पाहिला..
उघडा डोळे बघा नीट ...
एबीपी माझाच्या या ब्रीदवाक्याची महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रचिती आली
एबीपी माझाच्या बातमीनंतर निवडणूक आयोगाचे डोळे उघडले...
संतोष बांगर यांच्यावर सर्वात आधी कळमनुरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला..
((मुंबई रिपोर्टर पीटूसी -
एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्य निवडणूक आयोगानं तात्काळ हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. संतोष बांगर यांनी ज्या मतदान केंद्रावर नसती उठाठेव केली त्या मतदान केंद्रावरच्या अदिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. आता त्या अधिकाऱ्यांवर आमदार संतोष बांगर यांचा दबाव होता का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची बदली होण्याची दाट शक्यात वर्तवली जातेय. ))
व्हीओ-३
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात जोरदार वाग्युद्ध रंगलं
आता संतोष बांगर यांचे मतदान केंद्रातील व्हिडीओ बाहेर आल्यानंतर तानाजी मुटकुळेंना आरोपांची तलवार चालवण्याची आयती संधीच मिळालीय.
((
TEXT - आमदार संतोष बांगरांवर गुन्हा
PHOTO - संतोष बांगरचे व्हिडीओ वापरा
etxm hingoli mutkule new tt 021225 PS))
व्हीओ-४
निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय... त्यांच्यावर काय कारवाई होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल...
मात्र लोकशाहीच्या मूल्यांनाच पायदळी तुडवणाऱ्या संतोष बांगर यांच्यावर...
शिवसेना, म्हणजेच एकनाथ शिंदे कारवाई करणार का?
का शिंदेंच्या शिवसेनेसाठी संतोष बांगरांचा कारनामा गांभीर्यानं घेण्यासारखी गोष्ट नाहीय?
पाहुयात..
माधव दीपके एबीपी माझा हिंगोली