Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

आंदोलन संपलं... निर्णय झाला... पण आता चर्चा आहे आंदोलनानंतरच्या राजकीय संदेशाची...
राजकारणात घटना जितकी महत्त्वाची असते, तितकंच तिचं 'टायमिंग'ही महत्त्वाचं असतं. त्यामुळेच मंत्री संजय शिरसाठ यांनी आंदोलन सुरू असताना नाही... तर आंदोलन संपल्यानंतर अभिजीत दिपके यांच्या घरी दिलेल्या भेटीची चर्चा रंगली आहे.शिरसाठ म्हणतात, "दिपके माझे नातेवाईक आहेत." पण प्रश्न इतकाच... नातं जपण्यासाठी ही योग्य वेळ होती का?... की आंदोलन संपेपर्यंत थांबण्यामागेही राजकीय गणित होतं?... आणि आता या भेटीतून नेमका कोणता संदेश दिला जातोय?... पाहूया हा रिपोर्ट...
राजकारणात टायमिंगला किती महत्वं असतं..
हे अधोरेखित करणारा हा क्षण...
अवघ्या दोन महिन्यांमध्ये अभिजित दिपकेंनी..
मोदी सरकारला बारा वर्षांमधला सर्वात मोठा धक्का दिलाय..
जे देशातल्या कोणत्याही विरोधी पक्षाला जमलं नाही..
तेच तरुणांनी अवघ्या तीस दिवसांमध्ये करुन दाखवलं..
आणि त्यालाही कारण ठरलीय टायमिंग...
गेल्या महिन्याभरापासून अभिजित दिपके दिल्लीत आंदोलनं करतायेत..
तेव्हा शिरसाटांनी एकदाही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नव्हती..
मात्र, जसं आंदोलनं यशस्वी झालं..
तसं ते पोहोचले दिपकेंच्या घरी..