'12 आमदारांची फाईल भुतानं पळवली?' संजय राऊतांचा राज्यपालांना खोचक सवाल : स्पेशल रिपोर्ट
नवनाथ बन | 24 May 2021 08:23 PM (IST)
राज्यपालांनी निवडायच्या 12 जागांवरून शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राजभवनावर टीकास्त्र सोडले. अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात 12 आमदारांच्या यादीबद्दल विचारणा केली पण, अशी कोणतीही यादी नसल्याचा खुलासा राजभवनाने केला. त्यावरून राऊतांनी राज्यपालांना घेरलं आहे. मोदींनी 24 तासात सर्जिकल स्ट्राइक केला मग 12 आमदारांवर एवढं कोणतं संशोधन सुरु आहे, असा सवाल राऊतांनी केला आहे. तर संजय राऊत यांच्या आरोपाला भाजपने उत्तर दिलं आणि राऊत यांची मानसिकता तपासा असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला