Sanjay Raut Tweet Special Report : राऊतांच्या ट्विटने वादाचा भडका, राऊतांच्या अडचणी वाढणार?
abp majha web team | 20 Mar 2023 09:41 PM (IST)
विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याप्रकरणी संजय राऊतांनी आपलं लेखी उत्तर पाठवलं आहेे.. मी विधिमंडळाला नाही तर शिंदे गटाला चोरमंडळ म्हणालो.. विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे, मी या सभागृहाचा अवमान कधीच करणार नाही असं राऊतांनी म्हटलंय.. १ मार्च रोजी राऊत कोल्हापूर दौऱ्यावर होते.. सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी हे वादग्रस्त विधान केलं होतं.. त्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.