Sanjay Raut on Somaiya Special Report: कडाक्याच्या थंडीत संजय राऊतांचा पारा चढला ABP Majha
abp majha web team | 19 May 2022 11:28 PM (IST)

आपल्या राजकीय विरोधकांवर रोज धडाडणाऱ्या या तोफा आहेत तरी कुठं असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. सध्या मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर असलेले संजय राऊत आणि नवनीत राणा सध्या लडाखच्या सीमेवर आहेत. एरवी एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे हे दोन्ही खासदार संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून लडाखमध्ये आहेत. त्यांच्या वक्तव्यांनी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जरी तापलं असलं तरी लडाखच्या थंड हवेत सध्या दोन्ही खासदारांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात..