Sangli Digital Lockdown : सांगलीच्या वडगावात रोज लागतो डिजीटल लॉकडाऊन Special Report
abp majha web team | 23 Sep 2022 11:33 PM (IST)

सध्या मोबाईल आणि टिव्हीच्या अतिव्यसनामुळे मुलांचा अभ्यासच होत नसल्याची ओरड पालकांकडून होत असते. या उपकरणांच्या आहारी गेल्यानं मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. मुलांच्या या सवयी सोडवायच्या कशा, या विवंचनेत प्रत्येक पालक आहे. सांगलीतल्या कडेगावमधील मोहित्यांचे वडगाव या गावानं सामूहिक प्रयत्नांमधून मुलांचं हे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केलाय.