Samruddhi Mahamarg Spotholes Special Report : 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गावर 7 महिन्यात खड्डे
abp majha web team | 04 Aug 2023 09:33 PM (IST)

Samruddhi Mahamarg Spotholes Special Report : 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गावर 7 महिन्यात खड्डे
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गवर खड्डे पडलेत. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर MSRDC कामाला लागलीय. समृद्धी महामार्गावरील पॅकेज सहामधील पुलांवर पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी महामार्गावर पोहचलेत. महामार्ग सुरू होऊन जेमतेम सात महिने झाले आहेत. पण पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गावर कुठे खड्डे पडले आहेत, तर कुठे पुलांना भेगा पडत आहेत. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्याने महामार्गावरील पॅकेज सहा मधील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलंय.