✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Samruddhi Mahamarg Accident Special Report : समृद्धी महामार्गाला अपघातांचं ग्रहण, बुलढाण्यात 5 अपघात

abp majha web team  |  16 Dec 2022 10:14 PM (IST)
ABP News

Samruddhi Mahamarg Accident News: नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पाहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाला जेमतेम पाच दिवस उलटून गेले आहेत. या महामार्गावरून  वाहतूक सुरूही झाली. या पाचच दिवसांत या महामार्गावर एकट्या बुलढाण्यात पाच अपघात झालेत. सुदैवानं या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी होणारे हे अपघात मात्र चिंतेची बाब असल्याचं समोर येत आहे. नेमके हे अपघात का होतायत? अपघाताची नेमकी कारणं काय आहेत? याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात समृद्धी येईल, असं म्हंटलं जात होतं. पण गेल्या रविवारी या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 510 किमीच्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. या महामार्गावरून वाहतूक सुरूही झाली. खरं तर या महामार्गाची रचना 150 किमी प्रतितास या वेगानं वाहनं धावू शकतील, अशी तयार करण्यात आली आहे. पण याठिकाणी 120 किमी प्रतितासाची वेग मर्यादा असल्यानं यावर फक्त याच वेगात वाहनं चालविण्याची मुभा आहे. अतिशय सरळ रेषेत हा महामार्ग असल्यानं आणि गुळगुळीत रचना असल्यामुळे वाहन चालकाला आपण निर्धारित वेग मर्यादेच्या पलीकडे गेलोय, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे या महामार्गावर गेल्या पाच दिवसात अनेक अपघात झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या पाच दिवसांत फक्त बुलढाण्यातच पाच अपघात झाले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Samruddhi Mahamarg Accident Special Report : समृद्धी महामार्गाला अपघातांचं ग्रहण, बुलढाण्यात 5 अपघात

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.