Samruddhi Mahamarg : 8 तासांत मुंबई-नागपूर; समृद्धी महामार्गाचा कसा फायदा होणार? Special Report
२०१५ साली नागपूर ते मुंबई या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचं काम सुरु झालं. त्यानंतर या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम अत्यंत वेगानं मार्गी लागलं. तीन वर्षापूर्वी या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात हा महामार्ग पूर्ण झालाय... इगतपुरी ते आमणे या अंतिम टप्प्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलं. हा ७६ किमीचा अखेरचा टप्पा, एकूणच नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे? काय आहेत त्याची वैशिष्ट्ये? टप्प्याटप्प्यानं हा प्रकल्प कसा पूर्ण झाला? पाहूयात....
'समृद्धी'चे ४ टप्पे
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी.
राज्यातल्या दहा जिल्ह्यातून हा महामार्ग जातो
११ डिसेंबर २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी ५२० किमीचा पहिला टप्पा पूर्ण
२६ मे २०२३ रोजी शिर्डी ते भरवीर या ८० किमी. च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण
४ मार्च २०२४ ला भरवीर ते इगतपुरी २५ किमी.चा तिसरा टप्पा पूर्ण
गुरुवार ५ जून २०२५ ला इगतपुरी ते आमणे हा अखेरचा ७६ किमी. चा टप्पा पूर्ण
त्यामुळे ७०१ किमी. च्या या महामार्गावरुन
मुंबई ते नागपूर हा प्रवास आता फक्त ८ तासात पूर्ण होणार आहे...