Sameer Wankhede यांच्या मेहुणीवर ड्रग्ज प्रकरणात गुन्हा? मेहुणी बहाणा, समीर वानखेडे निशाणा?
abp majha web team | 08 Nov 2021 11:22 PM (IST)

मुंबई : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर केलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मानहानीची याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं नबाव मलिक यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवाब मलिक सोशल मीडियावर धडाधड उत्तर देत आहेत, तर अपेक्षा आहे की इथंही ते पटापट उत्तर देतील असा टोला लगावत नवाब मलिकांना मंगळवारपर्यंत यावर उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे.