Special Report : 'कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत', भिडे गुरुजींची जीभ घसरली
कुलदीप माने, एबीपी माझा | 08 Apr 2021 09:08 PM (IST)
सांगली : "मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत. तो *#*# (आक्षेपार्ह शब्द) प्रवृत्तीच्या लोकांना होतो, तो मानसिक आजार आहे," असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसंच कोरोना निर्बंधांवरुन त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीकाही केली आहे. सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.