Sachin Tendulkar Special Report : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची पन्नाशी ABP Majha
abp majha web team | 21 Apr 2023 11:50 PM (IST)

Sachin Tendulkar Special Report : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची पन्नाशी ABP Majha
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येत्या २४ एप्रिलला आपल्या वयाची पन्नाशी साजरी करतोय. पण त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मुंबईत आजच मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सचिननं मुंबईतल्या निवडक ४० क्रीडा पत्रकारांसोबत आज दुपारी आपला वाढदिवस साजरा केला. हा सोहळा क्रीडा पत्रकारांसाठी खूपच खास ठरला. या सोहळ्यात सचिननं त्याच्या २४ वर्षांच्या कारकीर्दीतल्या क्रीडा पत्रकारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.