Mohan Bhagwat On Indian Language : भाषेचा प्रांत, सरसंघचालकांची खंत Special Report
महाराष्ट्रात एकीकडे हिंदी विरुद्ध मराठी असा सामना रंगलाय. याचदरम्यान सरसंघचालक मोहन भागवातांनी भाषेच्या मुद्दयाला हात घातलाय. भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत अशी चिंता मोहन भागवतांनी व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी संस्कृत भाषेवर विशेष भर दिला. मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? भाषेबाबत त्यांनी कोणती आग्रही भूमिका मांडली? पाहूयात...
संस्कृत भाषेचा उल्लेख करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सध्याच्या भाषेच्या ऱ्हासाचा मुद्दा मांडलाय...
भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत. आपल्याला संस्कृत शिकवायला अमेरिकेतून प्राध्यापक येतात आणि
जे आपण त्यांना शिकवायला हवं ते तेच आपल्याला शिकवतात असं भागवत म्हणाले...
आपल्या समाजाला भाषिक वारशाच्या याच ऱ्हासाविषयी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मतही मोहन भागवतांनी संस्कृत भाषेच्या मुद्द्यावरून मांडलेत.
((बाईट - मोहन भागवत -
आज संस्कृत शिकवायला अमेरिकेतील प्राध्यापक येतात. मुळात आपण त्यांना जे शिकवायला हवे ते आपल्याला शिकवतात.))
व्हिओ - २
भागवतांचा मुद्दा जरी संस्कृत भाषेचा असला तरी त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या सद्यस्थितीची आठवण होते...
सोयीस्करपणे वापरली जाणारी इंग्रजाळलेली मराठी भाषा हे
घराघरातलं वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही.
(( बाईट - जे पालक मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकले त्यांची मुलं मात्र आता इंग्रजी माध्यमात शिकतात अशी का स्थिती ?))
व्हिओ - ३
मराठी भाषेच्या शाळेत शिकवण्याच्या मुद्द्यावरून मागच्याच आठवड्यात भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंना चिमटा काढला होता...
राज ठाकरेंनी नातवाला बालमोहन शाळेत घालावं असा सल्ला त्यांनी दिला होता.
तर त्यावर मनसेच्या गजानन काळे यांनी भाजपचे मोठे नेते ज्या इंग्रजी मिशनऱ्यांच्या शाळेत शिकले त्यांचा दाखला देत कुंडली काढली होती...
हे राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहिले तरी तरीही मराठी शाळांविषयी असणारी राजकीय अनास्था हे देखील यामागचं मोठं कारण आहे...
(( प्रा. दीपक पवार बाईट - भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत यावर तज्ज्ञांचं मत ))
व्हिओ - ४
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेला मुद्दा हा केवळ संस्कृत या भारतीय भाषेविषयी असला तरी हा मुद्दा महाराष्ट्रासाठी मराठीचा असणं क्रमप्राप्त आहे.
या सगळ्याचं राजकारण निवडणुकांच्या तोंडावर सुरू राहिलच...
पण जशी दक्षिणोत्तर भारत खंड व्यापून टाकणारी संस्कृत भाषा
हळूहळू लोप पावली आणि आता केवळ परीक्षेत 100 गुण मिळवण्यापूरती उरली
तसं मराठी भाषेचं होऊ नये यासाठी राजकीय आणि सामाजिक पातळीवर ठोस धोरणं आखावी लागतील याचं भान प्रत्येकाला यायला हवं...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा