Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

अजितदादा पवारांचा अपघात नसून घातपात आहे, हा आरोप त्यांचे पुतणे रोहित पवार सातत्यानं करतायत... आतापर्यंत ते विमान कंपनीला आणि तिच्या मालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत होता... मात्र कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत आरोपांचा पाढा वाचला... त्यानंतर भाजप नेते रोहित पवारांवर तुटून पडले असताना पवारांच्या राष्ट्रवादीतून मात्र सावधगिरीचे सूर उमटलेत... खुद्द रोहित पवारांची आत्या खासदार सुप्रिया सुळेदेखील त्यांच्याशी पूर्ण सहमत नसल्याचं दिसतंय... त्यामुळे रोहित पवार पक्षात आणि घरातही एकाकी पडलेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय... रोहित पवारांच्या त्या पत्रकार परिषदेवर कोणाचं काय म्हणणंय, बघुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये...
आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं भाजप नेत्यांनी द्यावीत अशी अपेक्षा रोहित पवार व्यक्त करतायत...
मात्र याप्रकरणी चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल हाती येत नाही, तोपर्यंत ठोस उत्तरं मिळणं कठीण दिसतंय...
मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर केंद्रीय गृहखातं आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून तपास पूर्ण होईल...
आणि रोहित पवारांसह महाराष्ट्राच्या जनतेला या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर मिळतील, ही अपेक्षा...