Rohit Pawar PC : अजित पवारांसोबत 100 टक्के घातपात, रोहित पवारांचा आरोप Special Report
राजकीय शोलेची सुरुवात... राजकीय संशयकल्लोळाच्या बातमीनं.. .२८ जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधन झालं.. त्यानंतर अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर अनेकदा घातपाताची शंका उपस्थित झाल्या... मात्र आता खुद्द शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवारांनी एक प्रेझेंटेशन देत अजित पवारांच्या अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले... फक्त सवालच नाही तर एक मोठा दावाही केलाय.. ज्यामुळे राजकीय वातावरण तापू शकतं.. पाहुयात..
हेच प्रश्न उपस्थित करत असतानाच..
रोहित पवारांनी गंभीर आरोपही केले..
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरुन...
अनेक थेरी गेल्या काही दिवसांमध्ये व्हायरल होतायेत..
त्यामुळे दादांच्या अपघातावरुन संशयकल्लोळ निर्माण झाला होताच..
त्यातच आज रोहित पवारांनी काही थेट प्रश्न उपस्थित करत..
ती दुर्घटना म्हणजे अपघात नाही तर घात असल्याचा..
संशय व्यक्त केला..
१. ऐनवेळी विमानाचे पायलट का बदलले?
२. दादांच्या दौऱ्याची वेळ आणि विमानाची वेळ का बदलली?
३. पायटलला विमान अपघात घडवून आणायचाच होता का?
४. दृश्यमानता नसतानाही विमानाचं लँडिंग का केलं?
५. ट्रान्सपाँडर एक मिनिट आधीच बंद का केला गेला?
६. पायलट 'मेडे'ऐवजी ओह शिट असं का ओरडली?
७. विमानाची स्टॉल वॉर्निंग सिस्टिम का बंद होती?
८. आदल्या रात्री उशिरा फाईलवर सही करण्यासाठी कुणी दबाव आणला?
याच तीन महत्वाच्या बाबी..
घातपाताचा संशय व्यक्त करत असताना..
इस्रायली गुप्तहेर यंत्रणा असलेल्या मोसादचं उदाहरण दिलं..
सखोल अभ्यास करून रोहित पवारांनी हे प्रेझेटेन्शन दिल्याचं दिसून आलं...
व्हीएसआर कंपनीबद्दलचे तांत्रिक मुद्दे तर त्यांनी उपस्थित केलेच...
त्यासोबत अजितदादांना आदल्या रात्री उशीर का झाला, याबाबतही शंका उपस्थित केलीय...
All Shows


































