Rohit Pawar on Ajit Pawar Accident : दादांच्या अपघाताच्या चौकशीचा तिढा FIR साठी लढा` Special Report

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत एफआयआर दाखल करायला पोलीस नकार देत असल्यामुळं सध्या रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेत. बुधवारी मुंबईत आणि आज बारामतीत त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही ठिकाणी पोलिसांनी याला नकार दिला. त्यामुळं दोन्ही ठिकाणी पोलिसांसोबत त्यांचे वादही झाले. एकीकडं हा एफआयआर दाखल व्हावा, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या रोहित पवारांनी आज भाजपवर आरोप करत केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केलीय. आज दिवसभरात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमध्ये.
रोहित पवारांनी व्यक्त केलेला घातपाताचा संशय आणि या प्रकरणाचा त्यांच्याकडून सुरु असलेला पाठपुरावा यामुळं विलिनीकरणाची चर्चा मात्र पूर्णपणे थांबलीय.
त्यातच पोलिसांनी एफआयआर दाखल करायला नकार दिल्यामुळं अजितदादांच्या विमान अपघाताबाबत उलटसुलट चर्चा राज्यात सुरु झाल्यात.
आता या प्रकरणात रोहित पवार काय पावलं उचलणार आणि सरकार याला कसा प्रतिसाद देणार, याकडं सर्वांचंच लक्ष असणार आहे.