Rohit Pawar on Trump : रोहित पवारांचं ट्रम्प कार्ड, निवडणूक आयोग देवांग दवेंवर हल्लाबोल Special Report
abp majha web team | 16 Oct 2025 09:54 PM (IST)
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बोगस वेबसाईट वापरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावे बनावट आधारकार्ड तयार करून निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर भाजप (BJP) इलेक्शन कमिशनचा वापर करून अजितदादा (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचा काटा काढेल', असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. पवार यांनी कर्जत-जामखेड आणि संगमनेरच्या मतदार याद्यांमध्ये हजारो बोगस मतदार घुसल्याचा आरोप केला. भाजपचे पदाधिकारी देवांग दवे (Devang Dave) यांनी निवडणूक आयोगाची वेबसाईट हाताळून याद्यांमध्ये फेरफार केल्याचा गंभीर आरोपही पवारांनी केला आहे. यावर, 'असे बिनबुडाचे आरोप करून काही सिद्ध होत नाही', असे उत्तर दवे यांनी दिले. पवार यांनी तयार केलेल्या कार्डवर १२ अंकी आधार क्रमांक नसल्याचेही समोर आले आहे, मात्र या प्रकरणाने मतदार याद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.