Reservation For Migrants : परप्रांतीयांना आरक्षण? मंत्र्यांचंही समर्थन? स्थानिकांच्या आरक्षणाचं काय?
गणेश ठाकूर, निलेश बुधावले, मुंबई | 03 Sep 2021 10:18 PM (IST)
मराठा आरक्षण , धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप राज्यात सुटलेला नाही. आणि त्यातच आता आणखी एका नव्या समाजाची आरक्षणाची मागणी होऊ लागली आहे. महारष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय म्हणजेच उत्तर भारतीय समाजाने मागणी केलीय. आणि या संदर्भात कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि कॉंग्रेस नेते नरसिंह खान यांची भेट घेत या संदर्भात ही मागणी केली गेलेली आहे. आणि परप्रांतीयांना OBC तून आरक्षण देण्याच्या मागणीला कॉंग्रेसचं समर्थन देण्यात आलंय.