'कॉन्ट्रॅक्ट शेतीशी आमचा संबंध नाही, नव्या कायद्यांचा आम्हाला फायदा नाही', Reliance चं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2021 11:38 PM (IST)
नवी दिल्ली: शेतकरी संघटना आणि सरकारमधील आजची आठव्या टप्प्यातली बैठकदेखील कुठल्याही तोडग्याविनाच संपली. आता पुन्हा 8 जानेवारीला शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये बैठक होणार आहे. गेल्या 39 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर बळीराजाचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारनं लागू केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख चार मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या आहेत. परंतु, शेतकऱ्यांची प्रमुख मागण्या असलेल्या एमएसपीवर लेखी विश्वास आणि तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याबाबत अद्याप सरकारकडून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.