Parbhani Reel Death Special Report : रिलचा नाद, जीवाला घात -दुचाकीला अपघात, एकाचा मृत्यू
abp majha web team | 26 Jan 2023 09:20 PM (IST)
तुमची मुलं मोबाईलवर रिल करत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी..परभणीत शाळकरी मुलांचा याच रीलने घात केलाय. नववीत शिकणारे चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन झेंडावंदनासाठी शाळेकडे निघाले पण रस्त्यातच ऑटोची धडक बसली आणि अपघात झाला. या चौघांपैकी एकाचा मृत्यू झालाय. याच अपघाताची दुसरी बाजू समोर आलीये. ती म्हणजे ही मुलं दुचाकीवर रिल करत होती. आणि या रिलनंतर काहीच क्षणात त्यांचा घात झाला.