#Remdesivir रेमडेसिवीरला सोलापूरचा आधार, बालाजी अमाईन्सकडून रेमडेसिवीरच्या मुख्य घटकांची निर्मिती
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
16 Apr 2021 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमेडिसीवरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात या रेमेडिसीवरचा तुटवडा जाणवतोय. कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या या रेमेडिसीवीर इंजेक्शनसाठी लागणारा काही कच्चा माल सोलापुरात तयार होतोय. सोलापुरातील बालाजी अमाईन्स या कंपनीत रेमेडिसिवीरसाठी लागणारे दोन सॉलवन्ट आणि एक कच्चा माल तयार होतोय. या इंजेक्शनसाठी जवळपास 27 घटकांची गरज असते. त्यापैकी ट्रायइथाईल अमाईन (टीईफ), डायमिथाईल फार्मामाईड (डीएमएफ), असिटोनायट्रायल या तीन प्रमुख कच्चा मालाची निर्मिती बालाजी अमाईन्स करत आहे.रेमेडिसिवरचा कच्चा माल तयार करण्यासाठी प्रामुख्याने इथेनॉलचा वापर होतो.