पावसाळ्यात अतिवृष्टीस उन्हाळ्यात दुष्काळ? चिपळूणमधल्या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती? Special Report
abp majha web team | 08 Feb 2022 09:21 AM (IST)

गेल्या जुलै महिन्यात रत्नागिरीतल्या अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमुळे जिल्हावासियांचे हाल झाले. या घटनेला आज सात महिने उलटलेयत. पण या सात महिन्यात इथली परिस्थिती पूर्ण बदललीय. कारण ज्या नद्यांनी जुलैमध्ये आपलं पात्र सोडलं होतं आज त्यापैकी बऱ्याच नद्या कोरड्याठाक पडल्यायत. तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झालीय. पण ही दुष्काळी परिस्थिती का निर्माण झाली? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...