हिंदुत्वावरुन राज आणि उद्धव यांची तुलना; साध्वी यांचं अयोध्यावारीचं आमंत्रण राज ठाकरे स्वीकारणार?
abp majha web team | 17 Oct 2021 09:52 PM (IST)
येणाऱ्या काळात शिवसेना आणि मनसेत हिंदुत्वाच्या मुदद्यावरुन संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे... याचं कारण दसरा मेळाव्यात मुख्य़मंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या दिली तर आता मनसेही हिंदु्त्वाच्या लढाईत उतरली आहे का असा प्रश्न पडतोय.. याचं कारण गुरु मॉं कांचन गिरी आणि सुर्याचार्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.. आणि हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भेट होत असल्याचं कांचनगिरींनी सांगितलं.. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वावरुन टीकास्त्र डागलं... आणि म्हणून येणाऱ्या काळात हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जातेय पाहुयात