Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग

आज राष्ट्रीय पर्यावरणदिन... सगळ्या देशात त्यानिमित्त कार्यक्रम झाले... कुठे वृक्षारोपण तर कुठे पर्यावरणविषयक परिषदा भरला... लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र या दिवसाचं औचित्य साधून एका मोठ्या प्रश्नावर बोट ठेवलंय... त्यांनी निकोबारला दिलेल्या भेटीची एक डॉक्युमेंटरी सोशल मीडियावर शेअर केली... यात केंद्र सरकारच्या ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या कथित हानीवर भाष्य केलंय... बघुयात राहुल गांधींचं नेमकं म्हणणं काय, हा प्रकल्प कशासाठी आहे आणि त्यावर सरकारचं म्हणणं काय आहे? या स्पेशल रिपोर्टमध्ये...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय...
भारताच्या सर्वाधिक दक्षिणेकडे असलेल्या ग्रेट निकोबार बेटाला दिलेल्या भेटीत त्यांनी स्कूबा डायव्हिंगचा आनंद लुटला...
पण यामागे उद्देश होता सध्या गाजत असलेला केंद्राच्या महत्त्वाकांक्षी 'द ग्रेट निकोबार' प्रकल्पाला विरोध...
साधारणतः १५ मिनिटांच्या या माहितीपटात राहुल गांधी यांनी या प्रकल्पामुळे होणारं पर्यावरणाचं नुकसान दाखवून देण्याचा प्रयत्न केला...
ग्रेट निकोबार केंद्र सरकारच्या पुढाकारानं राबवला जात असलेला एकात्मिक विकास प्रकल्प आहे...
अंदमान-निकोबार द्वीपसमूहात सर्वात दक्षिणेकडील असलेल्या या बेटावर ८१ हजार कोटींचा हा प्रकल्प प्रस्तावित आहे...
यात आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट बंदर आणि ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत...
शिवाय या प्रकल्पांमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळासाठी नव्या शहरांची निर्मिती केली जाणार आहे...
वीज प्रकल्पासह अन्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत...
बेटावरील पर्यटनवाढीसाठी या प्रकल्पात विशेष तरतूद करण्यात येणार आहे...
हे बंदर देशातलं सर्वात मोठं लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्याचा केंद्राचा मानस आहे...
मात्र या प्रकल्पाला अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून त्यामुळे निसर्गाची अपरिमित हानी होईल, असा दावा केलाय...
प्रामुख्यानं जंगलतोडीमुळे होणारं नुकसान, जैवविविधतेला असलेला धोका पर्यावरणवाद्यांनी अधोरेखित केलाय..
शिवाय या द्विपसमूहावर शतकानुशतकं राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनशैलीवर हा अखेरचा आघात ठरेल, असंही म्हटलं जातंय...
हा प्रकल्प आखताना तिथल्या आदिवासी समाजाला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय...