एक्स्प्लोर
India Alliance Protest : इंडियाचा महाएल्गार, सरकारविरोधात पुढाकार Special Report
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. मतचोरीचा आरोप केल्यानंतर इंडिया आघाडी निवडणूक आयोगाविरोधात मैदानात उतरली. तब्बल तीनशे खासदारांसह राहुल गांधींनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला. मात्र, या सगळ्यांना संसद भवनाच्या दारातच रोखण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदार बसमध्ये बसून संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. बसमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि मिताली बाग यांना भोवळ आली. पोलिसांनी इंडिया आघाडीच्या खासदारांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात आणले. 'वन मॅन वन वोट के बिना कॉन्स्टिट्यूशन का कोई मतलब नहीं है। और हमने क्लियरली दिखाया है कर्नाटक में कि वन वन मॅन वन वोट नहीं है। मल्टिपल मॅन मल्टिपल वोट, वन मॅन मल्टिपल वोट। सारा कुछ चल रहा है ठीक है,' असे राहुल गांधी यांनी म्हटले. जवळपास तासाभरानंतर सगळे खासदार पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. मोर्चामध्ये दिसलेली इंडिया आघाडीची एकजूट बिहार विधानसभेसह येऊ घातलेल्या इतर निवडणुकांमध्येही दिसणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
पुणे
व्यापार-उद्योग


























